'नवरा माझा नवसाचा २'मध्ये अशोक सराफ नव्या भूमिकेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2024

'नवरा माझा नवसाचा २'मध्ये अशोक सराफ नव्या भूमिकेत


मुंबई - ‘नवरा माझा नवसाचा’ (Navara Majha Navsacha) हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमातील गाणीही प्रचंड हिट ठरली होती. या सिनेमाच्या कथाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता तब्बल २० वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. आता या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, विजय पाटकर अशी ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमात अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी लालू कंडक्टरची भूमिका साकारली होती. अशोक सराफ यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्याही भलतीच पसंतीस उतरली होती. पण, ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये आता लालू कंडक्टर दिसणार नाही. ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सिनेमात अशोक सराफ तर दिसणार आहेत. पण, ते लालू कंडक्टरची भूमिका साकारणार नाहीत.

‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमातील अशोक सराफ यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अशोक सराफ लालू कंडक्टर नव्हे तर टीसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लालू कंडक्टरने ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये धमाल आणली होती. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये टीसी बनलेला लालू काय कमाल करतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ लालू -प्रसाद ही अशोक सराफ आणि विनोद तावडे यांची जोडी हिट ठरली होती. ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये अशोक सराफ टीसी झाले आहेत. पण, विनोद तावडे यात दिसणार का? याबाबत अद्याप कोणतीच अपडेट समोर आलेली नाही.

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात स्वप्निल जोशी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग पूर्ण झालं असून प्रेक्षक सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad