नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2024

नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्यामुंबई - वांद्रे - वर्सोवा कोस्टल रोडच्या कामामध्ये एक कनेक्टर गजधर बांध, सांताक्रूझ पश्चिम या ठिकाणी येणार आहे. हा कनेक्टर जेथे उतरणार आहे तेथील पुलाच्या खालील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना नागरिकांना समस्या जाणवणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे वांद्रे क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री अतुल सावे, आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, गृह विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वांद्रे पश्चिम परिसरातील विविध पायाभूत सुविधांचा विकास करत असताना, क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच भूसंपादन करताना त्यांचे पुनर्वसन होईल याची दक्षता घ्यावी. वांद्रे संक्रमण शिबिरातील गाळेधारकांना त्याच ठिकाणी पक्की घरे तसेच झोपडीधारकांचे परिशिष्ट-2 बनवून पुनर्विकासाची प्रक्रिया नियम व अटी तपासून सकारात्मकपणे राबवावी. तसेच म्हाडाच्या मैदान क्र. १ बांद्रा रेक्लमेशन या मैदानात देखभाल व दुरुस्ती, तसेच खार आणि वांद्रे येथे ५०० चौ. फुटाचे समाजमंदिर बांधण्यासाठी म्हाडा कडून नाहरकत (NOC) प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नियम तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

‘ओएनजीसी’च्या ‘सीएसआर’ निधीतून संपूर्ण प्रोमोनाडचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनवण्याबाबत, वांद्रे रिक्लेमेशन येथे रँम्प रोड तयार करणे, कोळीवाडे व गावठाणमधील घरांच्या पुनर्विकास, कोळीवाड्यात घरांची दुरुस्तीसाठी, कोळीवाडे व गावठाणमधील घरांसाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये स्वतंत्र तरतूद करणे, फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत, वांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आर.व्ही टेक्निकल हायस्कूल येथे स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु करण्यासंदर्भातील कामांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad