उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात

Share This


मुंबई - उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. जोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. तसेच केदारनाथ मंदिर दिल्लीत उभारणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत, मी त्यांच्या हिताबद्दलच बोलत असतो, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला याची पीडा अनेकांना आहे. कोणाचे हिंदूत्व खरे हे समजून घ्यावे लागेल. मात्र जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे. जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages