घटकोपर रेल्वे स्थानक परिसरात झुनझूनवाला महाविद्यालयाजवळ सकाळी साडेअकरा वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यात सहभाग घेतला. आजचे तरुण हे देशाचे उद्याचे भविष्य आहे. मात्र हे भवितव्य घडवू शकणाऱ्या आजच्या तरुणांना सक्षम करण्यास केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्यकर्त्यांच्या वरदहस्ताने ड्रग्स माफियांनी त्यांचे जाळे देशभर यशस्वीरीत्या पसरविले आहे आणि त्याच्या विळख्यात राज्यातील आणि देशातील युवा वर्ग बरबाद होताना दिसत आहे.
गेल्या एप्रिल-2024 अखेर अंमली पदार्थ खरेदी - विक्रीचे तसेच तस्करीचे तब्बल 6 हजार 761 गुन्हे दाखल झाले आहेत. तर ड्रग्सचे सेवन करणाऱ्या 5 हजार 745 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विविध यंत्रणांच्या छाप्यात जवळपास 4 हजार कोटींचे अंमली पदार्थ 1 हजार 16 ठिकाणांवरून जप्तही केले आहेत. तसेच 4 हजार 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अंमली पदार्थ मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात नष्ट केला आहे. इतकेच नाहीतर 150 कोटीहून अधिक एमडी-अंमली पदार्थ गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे. हे आकडे पाहता, आपले भविष्य नक्की सुरक्षित आहे का ? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष ऍड अमोल मातेले यांनी केला.
या आंदोलनात अशोक कणसे, खलिद मामू, अजित सकटे, विकास वाघमारे, राजेंद्र केदारे, दिलीप सातपुते, प्रशांत कालेकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, राजकीय वरदहस्त असल्यानेच या अमली पदार्थांच्या उत्पादनावर, विक्री तसेच वितरणावर कारवाई करण्यास प्रशासन हतबल आहे असा आरोप यावेळी केला.
अंमली पदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीवर वेळीच पायबंद घातला नाहीतर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने हे अभियान ठीक-ठिकाणी सुरु करण्यात येईल असा इशारा यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मुबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिला.
No comments:
Post a Comment