नाशिक - राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना नागरिकांना संरक्षण देणारे पोलिसही असुरक्षित असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक येथील पोलीस अकादमीत एका महिला पोलिसावर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला.
नाशिक येथे पोलीस अकादमी आहे. या पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पोलिसांची नियुक्ती केली जाते. या अकादमीमधील स्वच्छतेचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने एका महिला पोलिसाशी मैत्री केली. कंत्राटदाराने महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली असता महिलेने त्याला नकार दिला. याचा राग येऊन कंत्राटदाराने महिला पोलिसाला ती राहत असलेल्या शासकीय निवासस्थानात माराहण करत बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ सुद्धा कंत्राटदाराने बनवले.
घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. तक्रार केल्यास पोलीस अकादमी बदनाम होईल असे सांगत तक्रार करू नये म्हणून दबाव आणण्यात आला. अखेर पीडित महिलेच्या मैत्रिणीने साथ दिल्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या पोलीस अकादमीत महिला पोलिसावर बलात्कार झाल्याने पोलीस अकादमीत सुद्धा महिला सुरक्षित नसल्याची चर्चा सुरु झाली.
No comments:
Post a Comment