पुण्यात माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या, दोघांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पुण्यात माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या, दोघांना अटक

Share This

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आज त्यांची हत्या करण्यात आली.  पुण्याच्या के इ एम रुग्णालयात त्यांना नेले असता तिथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर आंदेकर यांची अशा पद्धतीने हत्या झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हा चिंतेचा विषय होणार आहे.

राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवून  वनराज आंदेकर हे २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते. नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांची अत्यंत शांत नगरसेवक अशीच गणना होत होती, आज नाना पेठेत त्यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करून ४ ते ५ जन पळून गेले. आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी जयंत कोमकर आणि गणेश कोमकर या दोन आरोपींना अटक केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages