Mega Block - मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mega Block - मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Share This

मुंबई - रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार १४ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मेल एक्स्प्रेस गाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकची दखल घेवून प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mega Block on Central and Harbour line) (Railway Mega Block)

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे- दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी १०.५० वाजल्यापासून ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी येथून डाऊन जलद/अप जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर ब्लॉक -
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११. १० वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तर सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल चालवल्या जातील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages