पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर जाणार सामूहिक रजेवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2024

पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर जाणार सामूहिक रजेवर


मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांनी त्यांच्या वसतिगृह निवास, स्टायपेंड वाढ आणि महागाई भत्ता यांच्या मागण्या अपूर्ण राहिल्यामुळे २२ जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे.

पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा वसतिगृह निवास, स्टायपेंड वाढ आणि महागाई भत्ता हे प्रश्न गेले कित्तेक वर्षे प्रलंबित आहेत. या मागण्यांचे निवेदन डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पालिका आणि राज्य सरकारकडे दिले आहे. डॉक्टरांच्या मागण्यांबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी पसरली आहे.

रुग्णालय आणि पालिका प्रशासनाने या समस्यांवर त्वरित तोडगा काढावा अशी डॉक्टरांची मागणी आहे. पालिका प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाचे आपल्या मागंनकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने २२ जुलैपासून सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या या रजा आंदोलनामुळे केईएम, नायर, सायन आणू कूपर रुगालयातील रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad