पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी विद्यार्थ्यांना वेतन वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी विद्यार्थ्यांना वेतन वाढ

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक २२ जुलै २०२४ पासून संप करण्याची सूचना दिली होती. या अनुषंगाने पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटनेसोबत (मार्ड) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत आज (दिनांक २० जुलै २०२४) बैठक पार पडली. बैठकीतून समाधानकारक तोडगा निघाल्याने प्रस्तावित संप मागे घेत असल्याचे मार्ड ने जाहीर केले आहे.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्ड ही राज्यातील सर्व सरकारी आणि महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना आहे. या संघटनेच्या वतीने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्‍युत्‍तर निवासी विद्यार्थ्‍यांनी दिनांक २२ जुलै २०२४ संपाची हाक दिली होती. पगारामध्‍ये वाढ, वसतिगृहामध्ये (हॉस्टेल) अधिक चांगल्‍या सुविधा, तसेच इतर काही मागण्‍यांसाठी त्‍यांनी संपाचा इशारा दिला होता.

या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मार्ड समवेत बैठक पार पडली. उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्व अधिष्‍ठाता देखील यावेळी उपस्थित होते. बैठकीत झालेल्‍या चर्चेमुळे सदर संप मागे घेण्‍याचे मार्डच्‍या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्‍य केले. 

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मासिक वेतनात शासकीय महाविद्यालयातील वि‍द्यार्थ्‍यांप्रमाणे वेतन देण्‍याचे व महागाई भत्‍त्‍यात वाढ देण्‍याचे तसेच गत ५ महिन्‍याची थकबाकी ही १० ऑगस्‍टपर्यंत देण्‍याचे महानगरपालिका प्रशासनाने मान्‍य केले आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचे या विद्यार्थ्यांनी मान्य केले. परिणामी रुग्‍णांची गैरसोय टळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages