राज्यातील ९ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2024

राज्यातील ९ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट


मुंबई - राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याकडून राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासांत कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावासाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या ९ जिल्ह्यांना पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय, संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पालघरलाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad