Budget - आरोग्य क्षेत्रासाठी ९० हजार कोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2024

Budget - आरोग्य क्षेत्रासाठी ९० हजार कोटी



नवी दिल्ली - देशातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ९० हजार १७१ कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत साधारण १२ टक्क्यांची वाढ यात करण्यात आली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरवरील तीन औषधांचे मूलभूत सीमाशुल्क माफ केले असल्याने कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

देशांतर्गत उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी देशातील वैद्यकीय क्षेत्रात क्ष -किरण यंत्रांमध्ये वापरल्या जाणा-या एक्स-रे ट्युब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील मूलभूत सीमा शुल्कामध्ये बदलांची रूपरेषा देखील दिली असून कॅन्सररुग्णांना लागणा-या ३ औषधांच्या सीमाशुल्कात पूर्णपणे सूट देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.अर्थसंकल्पीय भाषणात संबोधित करताना सितारामन म्हणाल्या, कर्करोगाच्या रुग्णांना दिलास देण्यासाठी मी आणखी तीन औषधांना सीमा शुल्कातून पूर्णपणे सुट देण्याचा प्रस्ताव ठेवते. तसेच वैद्यकीय क्षेत्रात किरण मशीनमध्ये वापरला जाणा-या एक्स-रेटिव्ह आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर वरील मूलभूत कस्टम ड्युटीत बदल सुचविते असेही त्या म्हणाल्या. हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील सुलभतेसाठी तसेच परवडणा-या वैद्यकीय उत्पादन आणि नवकल्पना यांच्या सर्व समावेशक धोरणाचा भाग आहेत.

कोणत्या घोषणा?
सध्याच्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा वापर करून अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची सरकारची योजना आहे आणि समस्या तपासण्यासाठी आणि संबंधित शिफारसी करण्यासाठी एक समिती स्थापन करेल. माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना एका व्यापक कार्यक्रमांतर्गत आणल्या जातील, ज्याच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधला जाईल. लसीकरणासाठी नवीन डिझाइन केलेले यू-विन प्लॅटफॉर्म आणि मिशन इंद्रधनुषचे तीव्र प्रयत्न देशभरात आणले जातील.

एक्स रे मशीन स्वस्त
एक्स रे मशीनमधील धातूंच्या आणि संबंधित मशीन तयार करण्यासाठी लागणा-या भागांवरील सीमाशुल्क कमी होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

कॅन्सरची औषधे होणार स्वस्त.!
अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कर्करोगाच्या रूग्णांना दिलासा दिला आहे. कॅन्सरच्या ३ औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे, कॅन्सरची औषधे स्वस्त होणार आहेत. या व्यतिरिक्त, खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारावी म्हणून, देशात नव्या १०० लॅब्स उभारल्या जाणार, असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

उपकरणे स्वस्त
कॅन्सरवरील उपचार करणा-या उपकरणांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. मेडीकल एक्स रे मशिनमध्ये बसविण्यात येणा-या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर फेस मॅन्युफक्टरींग प्रोग्रॅम बोलस्टर डोमेस्टीक प्रोडक्शन कॅपेसिटी अंतर्गत बेसिक कस्टम ड्यूटी कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे. हे उपाय वैद्यकीय क्षेत्रातील स्थानिक उत्पादन आणि नवीन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी केलेले आहेत. तसेच आरोग्यसेवा परवडणारी करण्यासाठी आणि सुलभ करण्याच्या केंद्र सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad