मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, आगीत महिलेचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, आगीत महिलेचा मृत्यू

Share This


मुंबई - रविवार रात्रीपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईत पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत सोमवारी पावसाचा रेड अलर्ट तर मंगळवार आणि शुक्रवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरीता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सांताक्रूझ येथे लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Red Alert)

रविवार ते सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात शहर विभागात ११०.१०, पूर्व उपनगरात १५०.५४ तर पश्चिम उपनगरात १४६.३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रात्री १ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत मुंबई शहरात ९७.४९, पूर्व उपनगरात ६५.१६ तर पश्चिम उपनगरात ८३.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी मुंबईकर घरी निघाले असताना पुन्हा पावसाने जोर धरला यामुळे हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, कुर्ला, भांडुप, चेंबूर स्वतिक पार्क परिसरात पुन्हा पाणी साचले. पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.

पावसामुळे शहरात ०६, पूर्व उपनगरात १४ व पश्चिम उपनगरात २० अशा एकूण ४० ठिकाणी फांदया, झाडे पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. यात कोणालाही मार लागलेला नाही. शहरात ०६, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. भिंत, घर, घराचा भाग पडण्याच्या शहरात ०२, पूर्व उपनगरात ०६ व पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १० तक्रारी प्राप्त झाल्या. सदर तक्रारी संबंधित विभागांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले. मार नाही.

महिलेचा मृत्यू -
८ जुलै रोजी दुपारी २.१४ वाजता अग्निशमन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार सांताक्रुझ (पूर्व) येथील दत्त मंदिर रोड, वाकोला पाईप लाईन येथील हाजी सिध्दिकी चाळीमधील एका खोलीत शॉर्टसर्कीटमूळे आग लागली होती. सदर आग त्वरीत विझविण्यात आली. आगीमध्ये जखमी झालेल्या एका महिलेस उपचारार्थ सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या कर्तव्यावरील सहायक वैद्यकीय आधिकारी डॉ. तौफीक अन्सारी यांनी सदर महिलेस मृत घोषीत केले. मृत महिलेचे नाव शांता कृष्णा आचार्य असून तीचे वय ७२ वर्षे असे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages