
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालये - आरोग्य खात्यात काम करणाऱ्या सुमारे 970 रोजंदारी, बहुउद्देशीय कामगारांना मुंबई महानगरपालिका वेतन/पगार देते तसेच बृहन्मुंबई क्षेत्रात आरोग्य सेवा (एचआयव्ही एड्स) देणाऱ्या मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत काम करणारे सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी केंद्रीय पुरस्कृत संस्था ज्यांना नॅको संस्थांमार्फत वेतन/पगार दिले जाते, असे (सुमारे 435) अशा एकूण सुमारे 1400 कामगार, कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम स्वरुपी सामावून घेण्यात यावे यासाठी रविवार, 11 ऑगस्ट, 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबईचे सहा. सरचिटणीस प्रदीप नारकर, उपाध्यक्ष मुकेश करोतिया, एड्स संस्थेचे कर्मचारी रवींद्र कदम, तुषार जाधव, धीरज मोहिते, तसेच संतोष पटाने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगरणी यांना संयुक्त सभा आयोजित करून या कर्मचाऱ्यांना कायम करून न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले.

No comments:
Post a Comment