कोकणात जाण्यासाठी वांद्रे - मडगाव एक्स्प्रेस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकणात जाण्यासाठी वांद्रे - मडगाव एक्स्प्रेस

Share This

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त पश्चिम उपनगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधत मध्य रेल्वेची वांद्रे- मडगाव एक्स्प्रेस ही द्विसाप्ताहिक ट्रेन ४ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

वसई, पनवेल करून कोकणात रेल्वे जाणार आहे. ही गाडी बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ६.५० वाजता वांद्रे येथून सुटेल आणि मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता सुटेल. बोरिवली, वसई रोड,भिवंडी रोड, पनवेल,रोहा,वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंवाडी रोड, थिविम आणि करमाळी आदी स्थानकांवर रेल्वे दोन्ही दिशेने थांबेल. या गाडीमध्ये एसी २ टायर, एसी ३ टायर, एसी ३ टायर , इकॉनॉमी, स्लीपर क्लास आणि साधारण द्वितीय श्रेणी डब्यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages