मुंबईतील 'या' १३ पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घ्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील 'या' १३ पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घ्या

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरुपाचे असून, काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज, शीव (सायन) स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिजवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज, प्रभादेवी–कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज आदींवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

या १३ पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages