बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी, कामगार संघटनांसोबत चर्चा करुन ही बाब देखील आता मार्गी लागली आहे.
महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. भत्ते वाढसंदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येईल.
No comments:
Post a Comment