अन्यायी जुलूमी सरकार पाडा! - शरद पवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अन्यायी जुलूमी सरकार पाडा! - शरद पवार

Share This

सोलापूर- अन्याय अन् जुलूम करणारे सरकार खाली खेचा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत शरद शेतकरी संवाद मेळावा पार पडला. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी शरद पवार म्हणाले की, मराठवाड्यातील जनता आमच्या सोबत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत जनता आमच्या सोबत आहे. बार्शीत आणि पंढरपूर या दोन गावातील सभा नेहमी चांगल्या होतात. आज भर उन्हात तुम्ही इथे उपस्थित आहात, याचा अर्थ आहे आपण बदलाच्या दिशेने आहात हे संकेत आहेत. नरेंद्र मोदी यांचा चेहरा राज्यात चालणार नाही. आम्ही जात-पात न बघता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहोत. लोकसभेला ४०० पार म्हणणाऱ्यांना ३०० ही जागा पार करता आल्या नाहीत. मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे आमच्यात कोणी नाही, या सरकारला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आंध्र आणि 
बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. त्यांची धोरणे बदलायची असतील तर सरकार बदला. अन्याय आणि जुलूम करणारे सरकार खाली खेचा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages