छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर बदलापूर स्थानकात चुकीचा सिग्नल दिल्याने होम फलाटात शिरल्यानंतर मालगाडीचे इंजिन बंद झाल्याने अप आणि डाउन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या घटना ताज्या असताना आज कल्याण-ठाकुर्लीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटून ट्रॅकवर पडली. ओव्हरहेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने स्फोट झाल्याचा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ओव्हरहेड वायर तुटल्याने कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. लोकल ट्रेनच्या लांबच लांब रांगा लागल्या. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेने प्रवशांचे मोठे हाल झाले. जवळ राहणाऱ्या प्रवाशांनी ट्रॅकवरुन पायी जाणे पसंत केले. लोकल सेवा सव्वा पाचच्या सुमारास पुन्हा सुरू झाली. मात्र अनेक लोकल रद्द केल्याने तसेच लोकल उशिरा चालवल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.
No comments:
Post a Comment