अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2024

अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू


नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर दुचाकीला भरधाव वेगातील हायवा ट्रकने ठोकल्यामूळे हा अपघात घडला आहे. हा अपघात घडल्यावर आरोपी ट्रक चालक पसार झाला असून पेल्हार पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. मरण पावलेल्या दोन्ही पती पत्नीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad