भाजप आणि काँग्रेसकडून नेहमीच ओबीसींवर अन्याय - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजप आणि काँग्रेसकडून नेहमीच ओबीसींवर अन्याय - प्रकाश आंबेडकर

Share This

मुंबई - ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची, 16 कोटींहून अधिकची रक्कम या शासनाच्या नाकर्तेपणामुळे परत गेली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वापराविना परत गेल्याने उपस्थित केला आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, एकीकडे आरक्षणाच्या मुद्यावरून भूमिका स्पष्ट न करून काँग्रेस ओबीसींना धोका देत आहे, तर दुसरीकडे महायुती सरकार ओबीसींच्या हक्काचा निधी ओबीसींच्या कल्याणासाठी न वापरता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणजेच काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष ओबीसींना धोका देत आले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने काही मागण्या घेऊन आरक्षण बचाव यात्रा काढली होती. त्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना एससी, एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळावी अशी मागणी होती. मात्र, काँग्रेस असो की, भाजप यांनी कधीच ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेतली नाही. त्यांना नेहमीच धोका देत आले असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता ओबीसींनी सावध राहून आगामी विधानसभेत आपल्या हिताची भूमिक घेणारा पक्ष कोणता आहे आणि आपल्या हक्काच्या आड येणारे पक्ष कोणते आहेत हे लक्षात ठेऊन त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहनही आंबेडकरांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages