विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सायन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2024

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सायन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा


मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्था, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, कर्मचारी व प्रशासनातील अधिकारी यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करून याबाबत पाठपुरावा करण्याचे तसेच असुविधांवर मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. तसेच अतिदक्षता व ट्रामा केअर विभागाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन आरोग्यव्यवस्थेची पाहणी केली.
  
रुग्णालय हे संवेदनशील ठिकाण असून येथे करणारे डॉक्टर, परिचारिका या रुग्णाला वाचविण्यासाठी अहोरात्र सेवा बजावित असतात. त्यामुळे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दानवे यांनी येथील परिचारिका व डॉक्टर यांना दिला.
 
यावेळी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सेक्रेटरी संजय वाघ, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक गजानन पाटील, माजी नगरसेवक रामदास कांबळे , पद्माताई शिंदे महिला विभागप्रमुख, मंगल तावडे, सेक्रेटरी म्युनिसिपल कामगार सेना, प्रमिला वाघधरे, विधानसभा संघटक महिला, सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad