भरत गोगावले एसटीचे २४ वे अध्यक्ष... - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भरत गोगावले एसटीचे २४ वे अध्यक्ष...

Share This

मुंबई - आमदार भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाचे २४ अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांनी एसटीच्या जागा विकसित करण्याचा भाडेकरार ३० वर्षावरून ६० वर्षं करण्याच्या राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, एसटीला उर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे असे, प्रतिपादन त्यांनी केले.
 
भरत गोगावले पुढे म्हणाले की, सन २००२ पासून एसटी महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करून त्या ३० वर्षासाठी भाडे तत्त्वावर देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्याचा मार्ग महामंडळाने अवलंबला आहे. भाडेकराराची मुदत ३० वर्षे ही अत्यंत कमी असल्यामुळे, या योजनेला केल्या २०-२२ वर्षांमध्ये म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. या काळात केवळ ४८ प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन "बांधा वापरा व हस्तांतरित करा" या योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त करून, एसटीच्या जास्तीत जास्त जागा भाडेतत्त्वावर देऊन त्यातून चांगला निधी उभारणे  महामंडळाच्या विचाराधीन होते.
 
अधिक माहिती देतांना ते म्हणाले, आज राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार "बांधा वापरा व हस्तांतरित करा" योजनेअंतर्गत व्यावसायिक तत्वावर जमिनीचा विकास करून, ती हस्तांतरित करण्याची मुदत ३० वर्षांवरुन ६० वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या महामंडळाकडे असलेल्या १५०० हेक्टर "लँड बँकेचा" विकास या माध्यमातून होऊ शकतो. सध्या १०० पेक्षा जास्त प्रकल्प या योजनेअंतर्गत विकसित करण्याचा आराखडा महामंडळ स्तरावर आखला जात असनू, लवकरच यापैकी २० व्यवहार्य प्रकल्पाची निविदा निघणार आहे. 

भविष्यात एसटीला तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच "बांधा वापरा व हस्तांतरित करा" करा या योजनेतून शेकडो कोटी रुपयाचा निधी एसटीला प्राप्त होणार आहे. तसेच महामंडळाच्या सध्याच्या आस्थापना (बसस्थानक, आगार व कार्यालय) ही नव्याने बांधून मिळणार आहेत. त्यामुळे एसटीला भविष्यात चांगले दिवस येतील. अर्थात, याव्दारे प्रवाशांना चांगल्या बसेस, विकसित बसस्थानके आणि स्वच्छ व सुंदर प्रसाधन गृहे देण्याचा माझा प्रयत्न राहील असे गोगावले म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages