मुंबई - शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली.. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बांगलादेशबाबत भाजपच्या दुटप्पी भुमिकेवरून भाजपला आणि सरकारला धारेवर धरलं. तसेच निवडणुकांना होणाऱ्या विलंबावरून टीकास्त्र डागलं. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालं असताना मुख्यमंत्री सेलिब्रिटींना घेऊन वर्षावर गणपती साजरा करत होते तर ही अराजकता पसरलेली असताना राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केला.
हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी, भाजपचे नेतेही हैराण -
भारत बांगलादेश क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची माहिती समाजमाध्यमांवर सद्या प्रसारित केली जातेय. यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडून सरकारला सवाल केलेत. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. 'मला परराष्ट्र मंत्रालयातून माहिती हवी आहे . बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले की नाही . भारतपाक वेळी आमची भूमिका स्पष्ट होती . मग आता भाजपनेच सांगितलं होतं हिंदूवर अत्याचार झाले, मग आता ही मॅच का ? बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले की नाही झाले ? माध्यमांनीही त्या बातम्या दाखवल्या . काही ठिकाणी दंगलीही झाल्या, भाजपने इथेही त्याबद्दल आंदोलनं केली . हे झाल्यानंतरही केंद्रात भाजप, बीसीसीआयमध्येही भाजप प्रणीत असताना क्रिकेट मॅच खेळत आहेत . मग हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी ? भाजपचे नेतेही हैराण आहेत यामुळे. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली .
'हरायचं नाही म्हणून निवडणुका घ्यायच्या नाहीत' हे भाजपचं धोरण -
निवडणुकांना होणाऱ्या विलंबवर आदित्य ठाकरे यांनी बोट ठेवला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले 'कपिल शर्मा शोवर निवडणूक आयुक्त येणार आहेत, त्यांना माझा सवाल आहे. जम्मू काश्मीर, हरियाणा व महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत नाहीत. हे लोकशाहीला हानीकारक आहे. भाजपला माहिती आहे की ते हरणार आहेत . त्यामुळे अनेक निवडणूका झालेल्या नाहीत. निवडणुकांना ते घाबरतायत, यामुळे संविधान धोक्यात आहे. भारताची लोकशाही धोक्यात आहे. आणि म्हणून हरायचं नाही म्हणून निवडणुका घ्यायच्या नाहीत हे भाजपचं धोरण आहे, अशी टीका केली .
No comments:
Post a Comment