नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रयान व्हिनस ऑर्बिटर मिशनला मंजुरी दिली. चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमानंतर आता शुक्रावर स्वारी केली जाणार आहे. शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे. या मोहिमेद्वारे शुक्र ग्रहाचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासाद्वारे शुक्र ग्रहाबाबत माहिती मिळू शकणार आहे. ही मोहीम शुक्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाची असणार आहे.
व्हेनस ऑर्बिटर मिशनसाठी एक खास अंतराळयान तयार करण्यात येणार आहे. हे अंतराळयान शुक्राच्या कक्षेत फिरून त्याचा अभ्यास करणार आहे. शुक्र ग्रहावर काय स्थिती आहे. त्याचे चंद्र कुठले, सूर्याचा शुक्रावर कसा प्रभाव पडतो, याचा अभ्यास केला जाणार आहे. असे सांगितले जाते की, शुक्र हा मानवी वस्तीसाठी योग्य असा ग्रह होता. मात्र, नंतर येथील स्थिती बदलली. ती कशी बदलली, त्याचाही अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे.
इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ म्हणाले की, शुक्र हा अंतराळातील महत्त्वाचा ग्रह आहे. त्याचा अॅसिडिक गुणधर्म कसा आहे, हे तपासण्यासाठी मोहीम आवश्यक आहे. शुक्र ग्रहावर वायूमंडळीय दबाव पृथ्वीपेक्षा १०० पटींनी जास्त आहे.
मोहिमेसाठी १२३६ कोटींचा निधी -
व्हेनस ऑर्बिटर मिशनसाठीचे स्पेसक्राफ्ट तयार करणे आणि ते लाँच करणे याची जबाबदारी इस्रोची असणार आहे. ही मोहीम २०२८ मध्ये लाँच केली जाणार आहे. या योजनेसाठी १२३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. शुक्रयान स्पेसक्राफ्टसाठी यातील ८२४ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
शुक्रयानाचे वजन २५०० किलो ग्रॅम -
शुक्रयानाचे वजन २५०० किलो असणार आहे. त्यामध्ये १०० किलोंचे पेलोडस असतील. या शुक्रयानात जर्मनी, स्वीडन, फ्रान्स, रशिया यांचेही पेलोड्स असण्याची शक्यता आहे. या शुक्रयानाचे आयुष्य चार वर्षांचे असेल. शुक्रयान जीएसएलव्ही मार्क-२ या रॉकेटने हे यान लाँच केले जाईल, अशी शक्यता आहे.
मोहिमेत सखोल अभ्यास -
शुक्रयान अंतराळात गेल्यानंतर शुक्र ग्रहाची संरचना, ज्वालामुखीचे प्रमाण तिथे आहे का, असल्यास ते कसे आहे, शुक्राच्या पृष्ठभागावर असलेला गॅस, त्याचे उत्सर्जन, हवेची गती, ढगांची गती या सगळ््यांचा अभ्यास करणार आहे. शुक्रयान शुक्राच्या अंडाकार कक्षेत चारही बाजूनी चक्कर लगावणार आहे, असे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment