बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये गोळीबार, एकजण जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये गोळीबार, एकजण जखमी

Share This

बदलापूर - बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची (Badlapur Firing) घटना घडली आहे. एका तरुणाने दोन जणांवर गोळीबार केला. या घटनेमुळं स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबाराच्या घटनेनं रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Firing in Badlapur railway station, one injured)

बदलापुरातील रेल्वे स्थानकावर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. अचानक गोळीबार झाल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक माहिती घेतली. एका व्यक्तीने दोन जणांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन ते तीन राऊंड फायर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या गोळीबारात एक जण जखमी झाला. शंकर संसारे असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पोलिसांनी काही वेळातच गोळीबार करण्याला ताब्यात घेतलं आहे. विकास नाना पगारे (वय 25) याला पोलिसांनी अटक केली आहे.

बदलापूर पश्चिम येथील वैशाली टॉकीजसमोर पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर तीन-चार जणांनी शंकर संसारे याला मारहाण केली. त्यामुळे शंकर बदलापूर रेल्वे स्थानकावर आला. यानंतर विकास पगारे याने त्याच्यावर गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला तेव्हा काही प्रवाशांनी ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages