अंधेरी येथील महिलेच्या मृत्यू प्रकरणी पालिकेकडून चौकशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंधेरी येथील महिलेच्या मृत्यू प्रकरणी पालिकेकडून चौकशी

Share This


मुंबई - मुंबईत काल (दिनांक २५ सप्टेंबर २०२४) सायंकाळी मुसळधार पावसाप्रसंगी, अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात एका महिलेचा पर्जन्य जलवाहिनीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी देखील नियुक्त करण्यात आली आहे.

या उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ ३ चे उप आयुक्त देविदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य आहेत. सीप्झ मध्ये पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ओढवला, त्या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages