मुंबई - समाजसेवक जमीला मर्चंट यांनी रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या आपेक्ष भाषणांवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाला विनंती करण्यात आली आहे की, धर्मविरोधी अशा भडकाऊ भाषणांवर प्रतिबंध करणारा कायदा लागू करण्यात यावा, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
१३ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या या याचिकेत महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि नितेश राणे यांनाही पक्षकार करण्यात आले आहे. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, नितेश राणे यांच्या विरोधात अनेक FIR नोंदवण्यात आले असतानाही, त्यांच्या अटकेसाठी पोलीसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. तसेच, अलीकडे रामगिरी महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यात एका विशिष्ट धर्माबद्दल दिलेल्या वक्तव्यांनंतर हिंसा उसळल्याचेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
जमीला मर्चंट यांच्या वकिल एजाज मकबूल यांनी म्हटले आहे की, आम्ही लवकरच सुप्रीम कोर्टाकडे या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती करणार आहोत, जेणेकरून अशा भडकाऊ वक्तव्यांवर देशभरात बंदी लागू होईल. याचिका कर्त्याच्या म्हणण्यानुसार, पोलिस केवळ FIR नोंदवतात आणि प्रकरण थंडावण्याचा प्रयत्न करतात. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्याविरुद्धच्या या प्रकरणात अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नाही.
उल्लेखनीय आहे की, याच वर्षी मार्च महिन्यात जमीला मर्चंट यांनी अशाच एका आपेक्ष भाषणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, जी अद्याप प्रलंबित आहे.
No comments:
Post a Comment