मालाडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालाडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

Share This

मुंबई - मालाड येथील एस आर ए च्या एका निर्मनाधिन इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू झाला. तर तीन जणांवर मालाड येथील एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहतीनुसार आज (५ सप्टेंबर २०२४)  मालाड पूर्व येथील नवजीवन इमारत, गोविंद नगर येथील एस आर ए च्या इमारतीचे काम सुरू होते. विक्रीसाठी ही इमारती उभारली जात होती. दुपारी बाराच्या २३ मजली इमारतीच्या २० व्या मजल्यावरील स्लॅब कोसळले. त्याखाली काही कामगार अडकले. त्या कामगारांना बाहेर काढून जवळच्या एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वी तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. दोन जखमींवर आयसीयूमध्ये तर एकावर ऑर्थोपेडीक विभागात उपचार सुरू आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages