
मुंबई - मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील एका घराला आज सकाळी आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे रिया पॅलेस नावाची 14 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 10 व्या मजल्यावरील एका घरात सकाळी 8 च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीत जखमी झालेल्या तिघांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. चंद्रप्रकाश सोनी वय 74, कांता सोनी वय 74, आणि पेलूबेटा वय 42 अशी मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून आग का लागली याचा तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment