आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी केले कौतुक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी केले कौतुक

Share This

मुंबई - सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे (मविआ) भिवंडी (पूर्व) उमेदवार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Rewant Reddy) यांची मुंबईत शनिवारी भेट घेतली. मुख्यमंत्री रेड्डी यांनी रईस शेख यांना भिवंडी (पूर्व) विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

भेटीविषयी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, आम्ही दोघांनी वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग उद्योगांसह अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांचा पुनर्विकास, वस्त्रोद्योग विकास आणि यंत्रमाग उद्योगांना सवलती देण्यासाठी मी केलेले प्रयत्न तसेच भिवंडीतील मोठ्या संख्येने असलेल्या पद्मशाली विणकरांचे योगदान यावरही चर्चा केली.

रईस शेख पुढे म्हणाले की, भिवंडीत सुमारे एक लाख तेलुगू भाषक नागरिक राहतात आणि त्यापैकी बहुंताश तेलगुभाषक कापड उद्योगात सक्रिय आहेत. कापड विणकामातील निपुणता यासाठी प्रसिद्ध असलेला पद्मशाली समाज हा भिवंडीच्या विकासासाठी आणि येथील यंत्रमाग उद्योगाच्या भरभराठीतील अविभाज्य घटक बनला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages