३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2024

३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त


मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केले जाते. या निवडणुकीदरम्यान आयोग आणि पोलीस यंत्रणेने तब्बल ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (Political News)(Elections)(Mumbai News)

३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त -
राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

३७६४ तक्रारी प्राप्त - 
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३७६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३७३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad