मालाडमध्ये विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालाडमध्ये विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Share This


मुंबई - मालाड पूर्व येथे एका व्यक्तीचा विजेचा शॉक लागून (Electrocution) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कमलेश शितब असे मृत व्यक्तीचे नाव असून तो 39 वर्षाचा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mumbai Latest News) (One dies due to electric shock in Malad)

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्योती हॉटेल, त्रिवेणी नगर, मालाड पूर्व येथून एक नाला जातो. या नाल्याजवळून जाताना काल (13 नोव्हेंबर) रात्री 11 च्या सुमारास कमलेश शितब जात होता. विजेचा शॉक लागल्याने तो नाल्यात पडला. कमलेश नाल्यात पडल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापूर्वी नागरिकांनी कमलेशला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages