सीएसएमटीहून सकाळी १० वाजून २५ मिनिट ते दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन फास्ट मार्गावरून पुन्हा वळवण्यात येतील.
सकाळी १० वाजून ५० मिनिटे ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि पोहोचतील.
हार्बर मार्गावर ब्लॉक -
अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते दुपारी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
No comments:
Post a Comment