भीम आर्मीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भीमा कोरेगावला जाण्यास बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2024

भीम आर्मीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भीमा कोरेगावला जाण्यास बंदी


मुंबई - प्रतिवर्षाप्रमाणे भीमा कोतेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यास भीम आर्मीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र बंदी असली तरी भीमा कोरेगावला जाणारच असा निर्धार या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून जनतेने मोठ्या संख्येने परंतु शांततामय मार्गाने भीमा कोरेगाव येथे यावे असे आवाहन केले आहे. 

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अबिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो लोक भीमा कोरेगाव येथे येत असतात. १ जानेवारी २०१८ मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आठवडाभर अशांततेचे वातावरण होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग राष्ट्रीय नहासचिव अशोक कांबळे व माजी प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे या मुख्य पदाधिकाऱ्यांना पुणे ग्रामीणचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२ ) अन्वये ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत भीमा  कोरेगाव व वढू बुद्रुक या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्या साहित्य २०२३ चे कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा देण्यात आला आहे . 
दरम्यान अशोक कांबळे याना या सदर बंदीबाबत विचारणा केली असता भीमा कोरेगाव येथे आम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास जात नसून आमच्या पूर्वजांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी जात असतो. १ जानेवारी २०१८ रोजी समाजविघातक शक्तींनी आमच्या लोकांवर हल्ले केले, दगडफेक करून गाड्या जाळल्या, लोकांना जखमी केले त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याचे सोडून उलट आमच्यावरच बंदी घालणे न समजण्यासारखे आहे. तरीही जनतेने शांततेच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर भीम कोरेगाव येथे यावे असे आवाहन अशोक कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad