30 तासांसाठी 'या' 5 विभागांचा पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

30 तासांसाठी 'या' 5 विभागांचा पाणीपुरवठा बंद

Share This

 

मुंबई - पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बुधवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून ते गुरुवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण ३० तास, जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत एस, एल, के पूर्व, एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या विभागात पाणीपुरवठा बंद-

१) एस विभाग : श्रीरामपाडाखिंडीपाडातुळशेतपाडामिलिंद नगर. नरदास नगरशिवाजी नगरमरोडा हिलभांडुप (पश्चिम)गौतम नगरफिल्टर पाडामहात्मा फुले नगरपासपोली गावतानाजीवाडी उदंचन केंद्रमोरारजी नगर. सर्वोदय नगरगावदेवी टेकडी. तुळशेतपाडाटेंभीपाडानरदास नगररमाबाई नगर १ आणि २साई हिल भांडुप  जलाशय येथून होणारा पाणीपुरवठा (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

एस विभाग : क्वारी मार्गप्रताप नगर मार्गजंगल मंगल मार्गटेंभीपाडागावदेवी मार्गदत्त मंदीर मार्गलेक मार्गसोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंपपर्यंतचा लालबहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसरभांडुप (पश्चिम)शिंदे मैदान जवळील परिसरप्रताप नगर मार्गफुले नगर टेकडीरामनगर उदंचन केंद्ररावते कंपाऊंड उदंचन केंद्रहनुमान टेकडीअशोक टेकडी,  (नवीन हनुमान नगर) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

२) एल विभाग : कुर्ला दक्षिण - काजूपाडासुंदरबागनवपाडाहलावपूलन्यू मील मार्गकपाडिया नगरनवीन म्हाडा वसाहतपरिघखाडीतकिया वॉर्डमहाराष्ट्र काटागफुर खान इस्टेटपाईप लाईन मार्गलालबहादूर शास्त्री मार्ग (पूर्व व पश्चिम)क्रांती नगरसंभाजी चौकरामदास चौकअण्णा सागर मार्ग (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

एल विभाग : कुर्ला उत्तर  ९० फीट रोडकुर्ला  अंधेरी मार्गजरीमरीघाटकोपर  अंधेरी जोडरस्तासाकीविहार मार्गमारवा उद्योग मार्ग भागसत्यनगर पाईपलाईन (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

३) जी उत्तर विभाग : धारावी मुख्य मार्गगणेश मंदीर मार्गदिलीप कदम मार्गजस्मीन मील मार्गमाहीम फाटकए. के. जी. नगर (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

जी उत्तर विभाग : जस्मिन मील मार्गमाटुंगा लेबर कॅम्पसंत रोहिदास मार्ग६० फीट मार्ग९० फीट मार्गसंत कक्कया मार्गएम. पी. नगर धोरवडाएम. जी. मार्गधारावी लूप मार्गए. के. जी. नगर (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

४) के पूर्व विभाग : विजय नगर मरोळमिलीट्री मार्गवसंत ओसिसगावदेवीमरोळ गावचर्च रोडहिल व्ह्यू सोसायटीकदमवाडीभंडारवाडाउत्तम ढाबा (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

के पूर्व विभाग : ओमनगरकांतीनगरराजस्थान सोसायटीसाई नगर (तांत्रिक क्षेत्र) सहार गावसुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

के पूर्व विभाग : आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ- मुलगाव डोंगरीएम. आय. डी. सी.मार्ग क्रमांक १ ते २३ट्रान्स अपार्टमेंटकोंडीविटामहेश्वरी नगरउपाध्याय नगरठाकूर चाळसाळवे नगरभवानी नगरदुर्गापाडामामा गॅरेज (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

के पूर्व विभाग : चकालाप्रकाश वाडीगोविंद वाडीमालपा डोंगरी क्रमांक १ व २हनुमान नगरमोटा नगरशिवाजी नगरशहीद भगतसिंग वसाहत (भाग)चरतसिंग वसाहत (भाग)मुकुंद रुग्णालयतांत्रिक विभागलेलेवाडीइंदिरा नगरमापखान नगरटाकपाडाविमानतळ मार्ग क्षेत्रचिमटपाडासागबागमरोळ औद्योगिक क्षेत्ररामकृष्ण मंदीर रोडजे. बी. नगरबगरखा मार्गकांतीनगर (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

के पूर्व विभाग : कबीर नगरबामणवाडापारसीवाडाविमानतळ क्षेत्रतरुण भारत वसाहतइस्लामपुरादेऊळवाडीपी. ऍन्ड. टी. वसाहत (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

५) एच पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनस (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

 

एच पूर्व विभाग : ए. के. मार्गखेरवाडी सर्व्हिस रोडबेहराम पाडाखेरनगरनिर्मल नगर (वांद्रे पूर्व) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages