पत्रकार दिवाकर शेजवळ यांना राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2025

पत्रकार दिवाकर शेजवळ यांना राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'मूकनायक' या पाक्षिकामागील सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्यासाठी मराठवाड्यातील ' शाक्य मूनी प्रतिष्ठानने यंदा राज्यस्तरीय 'मूकनायक पुरस्कार' सुरू केला आहे. पहिल्या वर्षातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे.

ते गेली ३५ वर्षे पत्रकारितेत असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. त्याची घोषणा बीड येथे झालेल्या एका बैठकीनंतर ' शाक्य मूनी प्रतिष्ठान ' चे अध्यक्ष प्रा. शरद वंजारे आणि सचिव प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. या बैठकीला प्रा.दिपक जमधाडे, सारिका वाघमारे,किशोरी मस्के, उज्वल गायकवाड, सिध्दार्थ वाघमारे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवाकर शेजवळ यांना ' मूकनायक पुरस्कार ' येत्या रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अशोका हॉल पी.ई.एस अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित समारंभात देण्यात येणार आहे. प्रा. शरद वंजारे यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभाला ॲड. जयमंगल धनराज, प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, प्रकल्प संचालक अशोक सिरसे, ज्येष्ठ पत्रकार विजय बहादुरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad