मुंबई / रत्नागिरी - रत्नागिरीची एयर होस्टेस असलेली भीमकन्या सोनाली चंद्रकांत जाधव (Sonali Chandrakant Jadhav) हीने ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ (Miss Madrasi North India 2025) किताब पटकावत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या किताबाने रत्नागिरीसह महाराष्ट्राचे नाव उंचावले असल्याने सोनालीच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल तिचे चौहोबाजूंनी विशेष कौतुक केले जात आहे.
सोनाली जाधव ही आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक सी. ए. जाधव यांची सुकन्या आहे. सोनालीचे बारावी (सायन्स) पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीमध्ये झाले. पुढील शिक्षण मुंबई तसेच गोव्यामध्ये झाले. त्यांनतर दिल्ली येथून हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेऊन २०१६ मध्ये तिची चेन्नई विमानतळावर हवाई सुंदरी म्हणून एका कंपनीत आंतरराष्ट्रीय विमानसेवेकरिता निवड झाली. सोनाली २०१६ साली हवाई सुंदरी (एयर होस्टेस) बनली. विशेष म्हणजे सोनालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. सोनालीने जिद्द, चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या यशाच्या एक एक पायऱ्या सर करीत यशस्वी गगनभरारी घेतली.
लहानपणी पाहिलेले स्वप्न सोनालीने खऱ्या आयुष्यात सत्यात उतरविण्यासाठी खूप परिश्रम घेतले. यावेळी तिच्या आई वडिलांचे तिला योग्य मार्गदर्शन लाभले. सोनाली सध्या एयर होस्टेस लीडर पदावर कार्यरत आहे. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या मिस मद्रासी इंडिया स्पर्धेत सोनाली जाधव हीने सहभाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत सोनालीने ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ किताब जिंकला आहे.
No comments:
Post a Comment