राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट व गतिमान करा - आरोग्य राज्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 February 2025

राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट व गतिमान करा - आरोग्य राज्यमंत्री



मुंबई - आरोग्य विभागांतर्गत राज्यातील नवीन शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच शासकीय रुग्णालयांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, आरोग्य सेवा अधिक बळकट व गतिमान करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

पायाभूत विकास कक्ष (IDW) प्रगतीपथावरील कामकाज आढावा बैठकीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी आरोग्य विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, संचालक नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, पायाभूत विकासाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. यावेळी त्यांनी प्रगतीपथावर असलेली कामे व नवीन कामांचा, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा, आयुष रुग्णालय, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम आदी बाबींचा आढावा घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad