स्वराज्यरक्षक - छत्रपती शिवाजी महाराज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2025

स्वराज्यरक्षक - छत्रपती शिवाजी महाराज



शिवाजी शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कार होता. त्यांची आई जिजाबाई ही लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शुरसरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तृत्वाने सामर्थ्यवान असलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव. राजकारणात मुरलेल्या व आनंदाचा उन्मेश बाळगणाऱ्या माता-पित्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 यावर्षी वैशाख शुध्द द्वितीय पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील शिवनेरी या डोंगरी किल्यावर झाला. त्यामुळे शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाहीतर अखिल भारतातल्या प्रत्येकाचे स्फुर्तीदायी दैवत आहे. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. तेव्हापासुन महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या (शिवाजी जयंती) स्मरणार्थ 19 फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केली आहे. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.

शिवाजी महाराजांचे नाव ‘शिवाई’ या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते. छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना ‘राजा’ ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता.

जनमानसात शिवकार्यासंबंधी जी काही स्थुल कल्पना असते, त्यापेक्षा महात्मा फुल्यांची कल्पना फार वेगळी होती अर्थात एक लोकोत्तर शुरवीर पुरुष, जन्मजात जननेता, स्वराज्य संस्थापक, लोककल्याणाची सदैव काळजी वाहणारा राज्यकर्ता या विविध नात्यांनी शिवाजीची व शिवकार्याची जी महती आहे, ती फुल्यांना नि:संशय मान्य होती. परंतू शिवाजी हा हिंदूधर्मरक्षक होता, त्याचे राज्य हे हिंदू धर्मराज्य होते. तो गोब्राम्हण प्रतिपालक, क्षत्रीय कुलावतंस छत्रपती होता. अशी शिवकार्याची महती काहीजणांकडुन सतत आणि पध्दतशीर पणे मांडण्यात येते ती महात्मा फुल्यांना अजिबात मान्य नव्हती आणि त्यांना त्याबद्दल कौतुकही नव्हते.

शिवाजीला लढाईचे आणि राज्यकारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले. दहा-बारा वर्षाचे असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा, माझ्या बांधवांना गुलामीतून आणि छळातून सोडवायचे. शिवाजींनी सÉद्रीच्या कडेकपारीत भटकून सवंगडी गोळा केले. तानाजी, नेताजी, सुर्याजी, बाजी, वेसाजी असे एका पेक्षा एक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले. श्री रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली आणि एका स्वरात घोषणा दिली. ‘हर हर महादेव’ महाराष्ट्रातल्या मावळखोऱ्या पासुन त्यांनी आपल्या लढयाला आरंभ केला. साम-दंड-भेदांचा उपयोग करत अवघ्या चौदाव्या वर्षी शिवाजींनी ‘तोरणागड’ जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. मग त्यांनी मागे वळुन पाहिलेच नाही एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली. युध्दात शक्तीपेक्षा युक्तीच्या वापर जाÃŸÖ केला. राक्षसी देहाचा अफजलखान भेटीचे ढोंग करुन शिवाजींचा घात करायला आला होता.

त्यांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्यासही प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि एक मोठा आदर्श निर्माण केला कोणत्याही कार्याचा आरंभ लहानशा मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठया मर्यादेत गेलेले आढळते. पवित्रगंगेचा उगम आणि पुढे तिचा झालेला विस्तार हे उदाहरण या दृष्टिने लक्षात घेण्या सारखे नाही कां? तर शिवाजी महाराजांचे कार्य जरी आरंभी महाराष्ट्राच्या विविध विषयाचा विरोध प्रकट करुन स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नापुरता मर्यादित असला तरी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्य प्रेमाची ज्योत पेटली त्यामुळे पुढे भारतात दक्षिणोत्तर ती प्रेरणा निर्माण झाली.

13 व्या शतकांत देवगीरीच्या यादवांची सत्ता संपविणाऱ्या परधर्मी काही सत्ताधिशांनी महाराष्ट्रावर पुढे दोन-तीनशे वर्षे सत्ता गाजविली. जसजशी त्यांची सत्ता मजबूत होत गेली, तसतशी त्यांच्यातली जुल्मी प्रवृत्ती वाढीला लागली. आपल्या प्रजेवर अन्यायाने कर लादणे, त्यांची घरे दारे आणि जमिनी बळकाविणे, स्त्रियांची अब्रू लुटणे आणि गुलाम म्हणून प्रजेला राबवणे असे प्रकार सुरु झाले. सारी मराठी माणसे मनातून या जुलूमी सत्तेवर रागावली होती, पण म्हणतात ना सत्ते पुढे शहाणपण चालत नाही - तशी अवस्था होती. औरंगजेब हा जबरदस्त लष्करी सामर्थ्यांचा, पराक्रमी, कट्टर मुसलमानपंथीय व दक्षिणेतील राजकारणाची माहिती असलेला बादशाह होता. पण शिवाजीने अफझलखान सारख्या पराक्रमी मुसलमान सरदारास यमसदनी पाठविल्यानंतर नंतर तो जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही. औरंगजेबाने शिवरायांना पकडून आग्रा येथे ठेवले, पण तेथूनही ते शिताफीने निसटले, तेव्हा औरंगजेबाने त्यांचा धसकाच घेतला.

स्वदेश स्वतंत्र व्हावा ही माता-पित्यांची इच्छा शिवाजीने पूर्ण केली. हिंदु धर्माचा पाडाव करुन सर्व हिंदुस्थान मुसलमानमय करुन टाकावाया महत्वाकांक्षेने झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवलकोंडयाची कुतुबशाही अशा वेढयात सापडलेला पूणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबाची हुकूमत होती. तो दिल्लीहून सतत त्यांना सैन्य व पैसा पुरावत होता. माता जिजाऊंनी शिवाजीराजांच्या मनात या अन्यायकारी वृत्ती विषयाचा विरोध आणि बीज निर्माण करुन स्वांतत्र्य आणि स्वराज्य या विषयींच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजीराजांच्या अंगभूत गुणांचा विकास केला आणि हळूहळू शिवाजीराजे त्या दिशेने प्रयत्न करु लागले. मराठी माणसांच्या मनातल्या रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी त्यांनी ‘मराठा तितुका मेळवावा’ हे सुत्र धरुन स्वातंत्र्यप्रेमी, पराक्रमी आणि निष्ठावान माणसांना एकत्र केले. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, काही स्वार्थी मराठी माणसे सरदारकी, जहागिरी आणि मोठया हुद्यासाठी परक्या सत्ताधिशांच्या चाकरीत धन्यता मानून शिवाजीराजांच्या स्वातंत्र्य लढयाला विरोध करत होते.

रायगडावर भेट ठरली, मिठी मारण्याचे सोंग करुन त्यांने शिवाजीवर तलवार चालवली. पण शिवाजी सावध होताच हातात लपविलेल्या वाघ नखांनी अफजलखानाचा कोथळाच बाहेर काढला. पळून गेला म्हणून शाहिस्ते खान भेटला, शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्येक संकटाला जोमाने सामोरे गेलेच पण त्यांचे संवगडीही त्यांना समर्थ साथ देत होते. सिंहगड सर करतांना तानाजी पडला. खिंड लढवितांना बाजीप्रभुने छातीचा कोट केला. महाडकर, प्रतापराव गुर्जर अशा एकाहुन एक शुर संवगड यांनी आपलं मत दिले. आपले प्राण दिले. तेव्हा स्वराज्य आकाराला आले. स्वराज्यात आता 85 किल्ले आणि दोनशे चाळीस गड आहेत.

लोकांनी शिवाजी महाराजांना राज्यभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला. महाराजांनी आपल्या मातेशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करुन राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. काशीचे प्रसिध्द पंडीत गागाभट्ट धार्मिक विधी करण्यासाठी आले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. शिवाजी राजा सिंहासनावर बसला. लोकांनी जयजयकार केला, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय' शिवाजी महाराजांनी आपले जीवन देव, देश आणि धर्म यासाठी वेचले. संत तुकाराम हे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते तर संतरामदास हे त्यांचे राजकीय गुरु होते. शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक 6 जून 1674 साली रायगडावर झाला. त्यानंतर थोडयाच काळात म्हणजे 6 वर्षानंतर 3 एप्रिल 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. रामदासांनी त्यांचे गुणगौरव करतांना म्हटले,

निश्चयाच्या महामेरु । बहुत जणासी आधारु ।।
अखंड स्थितीच्या निर्धारु । श्रीमंत योगी ।।

इतिहासाच्या पानावर……रयतेच्या मनावर……मातीच्या कणावर-आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपतींच्या 396 व्या जयंती दिना निमित्त मानाचा मुजरा….


प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad