
मुंबई - मध्य रेल्वेवर दिनांक २२/२३.०२.२०२५ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डरच्या लॉंचींगसाठी ०१:३० ते ०३:०० (मध्यरात्री) वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
बदलापूर (कल्याण एंड एफओबी) येथे १२ मीटर रुंदीचे एफओबी गर्डर (७ नंबर) आणि बदलापूर -वांगणी एफओबी (मीड- सेक्शन) येथे ४ मीटर रुंदीचे एफओबी गर्डर (४ नंबर) लाँच करण्यासाठी ब्लॉक परिचालीत केला जाईल. ब्लॉकमुळे, गाडी क्रमांक 11020 (भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोणार्क एक्सप्रेस) कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल येथे थांबेल.
खालील गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील -
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होईल.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३:५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -बदलापूर लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होईल.
– परळ येथून रात्री २३:१३ वाजता सुटणारी परळ-अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकापर्यंत जाईल.
– कर्जत येथून ०२:३० (मध्यरात्री) वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जतऐवजी अंबरनाथ स्थानकावरून सुटेल.
– ब्लॉकपूर्वी कर्जतला जाणारी शेवटची लोकल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३:३० वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०१:४९ वाजता पोहोचेल.
– ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल – कर्जत येथून ०३:३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५:५६ वाजता पोहचेल.
No comments:
Post a Comment