राज्य सरकार मीडियावर वॉच ठेवणार, 10 कोटींची तरतूद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०९ मार्च २०२५

राज्य सरकार मीडियावर वॉच ठेवणार, 10 कोटींची तरतूद


मुंबई - गेल्या काही वर्षात इंटरनेटवर आधारित सोशल आणि डिजिटल मीडियाचा वापर वाढला आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिकसह सोशल आणि डिजिटल मीडियावर बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. प्रिंट, इलेक्ट्रॉनिकसह सोशल आणि डिजिटल मीडियावरील बातम्यांवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभाग म्हणजेच डीजीआयपीआरने डीजीआयपीआर मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल 10 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 

डीजीआयपीआरच्या पातळीवर एक स्वतंत्र उपक्रम म्हणून राबवला जाणार आहे. ही एजन्सी एका वर्षासाठी नियुक्त केली जाईल आणि जर तिचे काम योग्य असेल तर तिचा करार दोन वर्षांनी वाढवता येईल, असे सांगण्यात आले आहे. सोशल, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे सरकारसंबंधी सकारात्मक आणि नकारात्मक वृत्तांचे मॉनेटरिंग कक्ष विश्लेषण करून, नकारात्मक तसेच दिशाभूल करणाऱ्या वृत्तासंबंधी संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल आणि सोशल मीडिया आणि इतर नवीन माध्यमांमधील बातम्यांवर सरकारने नेमलेल्या एजन्सीद्वारे दिवसभर लक्ष ठेवले जाणार आहे. बातम्यांचा ट्रेंड, मूड आणि आशयासंबंधी अलर्ट दिला जाईल, असे जीआरमध्ये म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आणि डिजिटल मीडिया, ऑनलाईन न्यूज वेबसाईट्स आणि न्यूज अ‍ॅप्ससारख्या न्यूज मीडियाचा विचार करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात, भविष्यात काही नवीन माध्यमे आली तर त्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. या सेलचे संचालन करण्यासाठी नियुक्त केलेली स्पर्धात्मक संस्था वृत्त आणि माहितीचे संकलन आणि विश्लेषण करून, त्याच्या भूमिकेत महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या अहवालांच्या विलपिंग्ज पीडीएफ स्वरूपात सादर करणे समाविष्ट असणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS