28 मे ला मुंबईत 'या' विभागात 15 टक्के पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2025

28 मे ला मुंबईत 'या' विभागात 15 टक्के पाणीकपात


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी - निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवार दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १३ तासांसाठी नियोजित आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात‍ येणार आहे.

तसेच ठाणे व भिवंडी –निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांसदेखील ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. संबंधित परिसरांमधील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे.

प्रभावित विभागांचा तपशील पुढीलप्रमाणे -
शहर:
१. एफ दक्षिण विभाग– पूर्ण विभाग

२. एफ उत्तर विभाग– पूर्ण विभाग

पूर्व उपनगरे:
१. टी विभाग- मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र

२. एस विभाग- भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र

३. एन विभाग- विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर

४. एल विभाग- कुर्ला (पूर्व) क्षेत्र

५. एम पूर्व विभाग - पूर्ण विभाग

६. एम पश्चिम विभाग - पूर्ण विभाग

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS