डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हा, पालिकेचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2025

डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हा, पालिकेचे आवाहन


मुंबई - ‘एन’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणी डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

दरम्यान, एन विभाग कार्यालयातर्फे वरिल ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. तरीही स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.  

पावसाळ्यादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. 

‘एन’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या भागातील धोकादायक इमारतींना / झोपड्यांना एन विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS