Operation Sindoor लोढा फाउंडेशन भारताच्या वीर जवानांसोबत खंबीरपणे उभं - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Operation Sindoor लोढा फाउंडेशन भारताच्या वीर जवानांसोबत खंबीरपणे उभं

Share This

मुंबई - आपल्या सशस्त्र दलांचे शूर जवान १४० कोटी भारतीयांच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाचं रक्षण करत आहेत. त्यांचं शौर्य आणि बलिदान यासाठी आपण सदैव ऋणी आहोत. त्यांच्या त्यागाला मानवंदना म्हणून, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी लोढा फाउंडेशन पुढील प्रकारे सहकार्य करेल. 

शहीदांच्या मुलांचा कॉलेजपर्यंतचा शैक्षणीक फी, पुस्तके, वसतिगृह यासह सर्व खर्च लोढा फाउंडेशनकडून केला जाईल. याशिवाय, Lodha Genius Program अंतर्गत प्रगत शैक्षणिक प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील या मुलांना दिलं जाईल. शहीदांच्या पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी मदत केली जाईल. इच्छुक असतील तर त्यांना लोढा ग्रुप आणि लोढा फाउंडेशनमध्ये नोकरीसाठी प्राधान्य दिलं जाईल.

शहीदांच्या पालकांसाठी पुढील २० वर्षांसाठी आरोग्य विमा सुविधा दिली जाईल. याशिवाय, देशाच्या वीर जवानांना आधार देण्यासाठी इच्छुक नागरिक आणि कॉर्पोरेट संस्थांनी योगदान देता यावं यासाठी ऑपरेशन सिंदूर / Patriots Fund स्थापन करण्यात आला आहे. या निधीतून ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या किंवा कायमस्वरूपी जखमी झालेल्या जवानांच्या आणि नागरिकांच्या कुटुंबांना मदत केली जाईल. लोढा फाउंडेशन आपल्या सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि त्यांच्या आवश्यक गरजांनुसार संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या:
https://www.lodhagroup.com/lodhafoundation/operation-sindoor-fund/
किंवा ईमेल करा: sindoor.patriots@lodhafoundation.org

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages