Mumbai News अंधेरीच्या गोखले पूलाचे आज लोकार्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News अंधेरीच्या गोखले पूलाचे आज लोकार्पण

Share This

मुंबई - अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाचे बांधकाम १०० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज रविवार, ११ मे रोजी या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यानंतर नागरिकांसाठी पूल खुला करण्यात येणार आहे. गोखले पूलाचे आज लोकार्पण होणार असल्याने अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागात जाणाऱ्या वाहन चालकांना, प्रवाशांना तसेच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.  

गोखले पुलाचा भाग ३ जुलै २०१८ साली कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर पुलाचा काही भाग धोकादारक म्हणून पुनर्बांधणीसाठी मुंबई महापालिकेने तो बंद केला होता. तब्बल एक ते दीड वर्ष पुल बंद होता. या कालावधीत पुलाच्या सर्व बाजूचे काम करण्यात आले. यामध्ये रेल्वे हद्दीतील काम, दोन्ही बाजूचे चढ - उतार मार्ग आणि सी. डी. बर्फीवाला पुलास जोडणाऱ्या 'कनेक्टर' कामाचा समावेश आहे. तसेच अपघात प्रतिबंधक अडथळा ध्वनिरोधक कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदी कामे पुर्ण झाल्याने आता त्याचा लोकार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या पुलाला बर्फिवाला पुलाचीही जोड देण्यात आली असून त्याचाही पुर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा मार्ग सुरु झाला आहे. आता पश्चिमेकडून पुर्वकडे जाणारा मार्गही सुरु करण्याचे नियोजन महापालिकेचे आहे.

महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूल व पुलाची इतर सर्व अनुषंगिक कामे पूर्ण होत आहेत. तसेच, विक्रोळी रेल्‍वे स्‍थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम ९५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुलाची उर्वरित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे, बांगर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages