
मुंबई - चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील सांची अनंत धनसरे ही आदर्श विद्यालयाच्या विध्यार्थीनीने १० वी मध्ये ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरी आली आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून गरीबीतून घवघवीत यश मिळवल्याने सांचीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सिध्दार्थ कॉलनी येथील छोट्याशा घरात राहणाऱ्या सांचीची आई स्वाती गृहिणी असून वडील अनंत एका छोट्या दैनिकात पत्रकार असून त्यांना पगार जेमतेमचं आहे. जोडधंदा म्हणून पुस्तके विकणे आणि प्रकाशित करण्याच्या व्यवसायात आहेत. तसेचं ते जून्या पुस्तकाचे संग्राहक आणि लेखक आहेत.
लहानपणापासूनच सांचीला पुस्तके वाचनाची, लिहीण्याची गोडी लागली. तिने अनेक हिंदी, मराठी कविता लिहील्या असून शाळेच्या वार्षिक पत्रिकेत त्या छापून आल्या आहेत.
सांचीने सी ए होण्याचे ध्येय ठेवले असून अभ्यासा व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध, विज्ञान आणि प्रेरणादायी पुस्तके वाचण्याची व चित्रकलेची आवड आहे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे कधी शाळेची फी तर कधी वह्या पुस्तके सुद्धा वेळेवर मिळत नसताना सुद्धा सांचीने अभ्यासावरुन लक्ष विचलीत होऊ दिले नाही.
सांचीच्या एका पायावर शस्त्रक्रिया झाली असून जास्तवेळ एकाठिकाणी बसता येत नाही. पायात प्रचंड कळा येतात. शिकण्याची जिद्ध असलेल्या सांचीने अशा अवस्थेत पंधरा सोळा तास बसून आभ्यास करून यश संपादन केल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
एका संघर्षातून सांची सुटली असली तरी पुढे आजून शिक्षणासाठी तिला भरपूर संघर्ष करायचा आहे. सांची म्हणते रडत बसण्या पेक्षा माणसाने आपल्या परिस्थितीशी सतत झगडत राहील्याने मार्ग सापडत राहतात. मला सी ए व्हायचे आहे त्या साठी मी प्रयत्न करीत राहणार आहे. असे तीने सांगितले.
No comments:
Post a Comment