
मुंबई - सीबीएसई बोर्डाच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या 8 जूनला समाप्त होतील आणि या शाळा 9 जून 2025 पासून सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या पंधरा तारखेला समाप्त होणार आहेत. 15 जून 2025 रोजी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपतील आणि 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून नियमितपणे सुरू होणार नाहीत. राज्यातील विदर्भ विभागातील म्हणजेच नागपूर आणि अमरावती या दोन विभागातील 11 जिल्ह्यांमधील शाळा थोड्या उशिराने सुरू होणार आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भातील शाळा सकाळ सत्रात भरवल्या जाणार आहेत. कारण म्हणजे तेथील तापमान वाढ. विदर्भात जून महिन्यात देखील मोठे तापमान पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने हा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये अगदीच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात परतण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत, तसेच त्यांनी शाळेची तयारी सुद्धा सुरु केली आहे. नवीन वही स्कूल बॅग, पेन, पेन्सिल अशा वस्तूंची विद्यार्थ्यांकडून खरेदी सुरू झाली आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक शाळांनी प्रवेशप्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे.
No comments:
Post a Comment