पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला गती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला गती

Share This

मुंबई - आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

या पत्राद्वारे मंत्री लोढा यांनी म्हाडाकडे मागणी केली होती की, उपकर प्राप्त इमारतींना दिल्या गेलेल्या ७९(ए) नोटीसमुळे दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव मंजूर करून कामांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

म्हाडा मंडळाने मंत्री लोढा यांच्या सूचनेची दखल घेतली असून, सदर मागणी मान्य करत इमारतींच्या दुरुस्तीबाबतचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पावसाळ्यात नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेचे संभाव्य नुकसान टळणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी आधीच वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कामांना वेगाने गती मिळणार असून, पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages