
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईसह 9 महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने लोकसंख्येनुसार मुंबई महानगर पालिकेची प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी 227 प्रभाग असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांहून अधिक काळ रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश निवडणुक आयोगाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्याने घेतल्या जाणार आहेत. टप्प्यात राज्यातील 9 महानगर पालिकांच्या निवडणूका होत आहे. निवडणुकीच्या आधी महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये 227 प्रभाग -
महाविकास आघाडीचे सरकारने मुंबईत 236 प्रभाग केले होते. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परतू ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये आता 227 प्रभाग असणार आहेत. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
महानगर पालिकांच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये प्रभाग रचना करणे आणि आरक्षण ठरविणे, विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे, प्रत्यक्ष निवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो. या तिनही टप्प्यांच्या प्रक्रियेमध्ये उप-टप्पे देखील आहेत.
या महानगरपालीकांसाठी चार सदस्यीय प्रभाग
अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत.
‘अ’ वर्ग महानगर पालिकेत – पुणे, नागपूर
‘ब’ वर्ग महानगर पालिकेत ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड,
‘क’ वर्ग महानगर पालिकेत नवीमुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर , कल्याण-डोंबिवली यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment