गणेशोत्सवा पुर्वी कोकण रेल्वेची कार रो रो सेवा सुरु होणार ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणेशोत्सवा पुर्वी कोकण रेल्वेची कार रो रो सेवा सुरु होणार !

Share This

रत्नागिरी दि ६ जून - गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासाठी दिलासा देणारी बातमी आहे. कोकण रेल्वे कडून गणेशोत्सवा पूर्वी रो रो सेवा सुरू केली जाणार आहे. रेल्वेवर स्वत:ची गाडी चढवून थेट कोकणात जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होऊ शकणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे रो रो सेवेमधून आता ट्रक प्रमाणे चारचाकी कार गाड्यांची ही रो रो सेवा सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासनाने सुरु केला आहे. ज्या प्रकारे रेल्वेकडून ट्रकची वाहतूक केली जाते त्याचप्रमाणे आता कारची देखील वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच या कारमधून प्रवाशांना प्रवास करणे ही शक्य होणार आहे. कोकण रेल्वेची ही सेवा गणेशोत्सवात प्रायोगिक तत्वावर मुंबई ते गोवा दरम्यान सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. तसेच, महामंडळाच्या बससेवा आणि रेल्वेला ऐनवेळी बुकिंग मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी एक पर्याय म्हणून कार वाहतूक सुरु झाल्यास कोकणवासीयांना याचा फायदाच होणार आहे.

कोकण रेल्वे कडून वॅगन ट्रकच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र कारच्या वाहतुकीसाठी वॅगन तयार करण्यासाठी काही तात्रिंक बाबींवर काम करण्याची गरज असल्याचे मत कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. येत्या गणपती उत्सवात ही सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे कोकण प्रशासना कडून सांगण्यात येत आहे. अशाप्रकारची सेवा कोलाड आणि मंगळुरु मार्गावर सुरु आहे. कोलाड येथे वाहनांना रेल्वेत चढविले जाते. अशा वाहनातील चालक, क्लिनर (असल्यास) आणि इतरांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा लागतो. मात्र कोकण मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाल्यास याचा कार वहातुकदार व प्रवाशांना चांगलाच फायदा होणार असल्याचे व मुंबई गोवा महामार्गावरील वहातूक कोंडी सोडविण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages